मिरजगांव(अभिषेक भुजबळ):गणेशोत्सवातील देखावा आणि डीजे साउंड अशा गोष्टींवर अवाजवी खर्च न करता मिरजगांव येथील जिल्हा परिषद शाळा येथे क्रांती युवक मंडळ क्रांती चौक मिरजगांव यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

देशासाठी लढणाऱ्या जखमी सैनिकांसाठी तसेच अपघातात जखमी झालेल्या गरजू रुग्णांसाठी क्रांती युवक मंडळ क्रांती चौक मिरजगांव यांनी एकत्र येत या रक्तदान शिबिराचे आयोजन केले.मिरजगांव येथील गणेश मंडळे नेहमी आपली सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही जाणीव कायम या गणेश मंडळाना असते. अशीच सामाजिक बांधिलकीची जाणीव या मंडळानी जोपासली आहे.
या रक्तदान शिबिरात जवळपास 156 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.रक्तदानात संचयित झालेले रक्त ‘आनंदऋषी ब्लड सेंटर अहमदनगर’ला देण्यात आले.प्रत्येक रक्तदात्यास सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र मंडळाच्या वतीने देण्यात आले.
मिरजगाव येथील सर्व गणेश मंडळांनी व नागरिकांनी रक्तदानसाठी सहकार्य केले.या कार्यक्रमासाठी क्रांती युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेतली व या पुढे ही असे सामाजिक कार्यक्रम घेण्याची शपथ घेतली.