राजुरीच्या गणेश सहकारी दूध व्यवसायिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमिळीच्या वातावरणात

संस्थेच्या वतीने सभासदांना १० टक्के लाभांश व प्रति लिटर १ रुपया बोनस देणार-बाळासाहेब हाडवळे

राजुरी(गंगाराम औटी): राजूरी येथील गणेश सहकारी दुध व्यावसायिक संस्थेची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब हाडवळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती दिपक औटी, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक कुंडलिक हाडवळे, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण घंगाळे,माजी अध्यक्ष गोविंद औटी, सुभाष पाटील औटी,एम.डी.घंगाळे,वल्लभ शेळके, एकनाथ शिंदे, जि.के.औटी,चंद्रकांत जाधव मुरलीधर औटी कारभारी औटी अनंतराव गटकळ जयसिंग औटी मोहन हाडवळे,धीरज औटी निलेश हाडवळे ,दुध उत्पादक गवळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवाजी औटी दत्तात्रय डुंबरे,किशोर औटी, विठ्ठल जाधव व अविनाश हाडवळे या शेतक-यांणी सर्वात जास्त गाईचे दुध पुरविणारे तर रंजना औटी,शिला हाडवळे , सुवर्णा औटी, बाळासाहेब औटी , आशा हाडवळे यांनी सर्वात जास्त म्हैस दूध पुरवठा केल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

संस्थेला सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या गवळ्यांच्या सत्कार करताना मान्यवर.


संस्थेचे दुध गवळयांसाठी माफक दरात किराणा ,मेडीकल , पशुखाद्य विभाग चालु असुन राजुरी दुग्धजन्य पदार्थ केंद्र चालु केलेले आहे

संस्थेला तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग, तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सहकारी उत्कृष्टता पुरस्कार २००४ मिळालेला आहे. आदर्श दुध संस्था पुरस्कार २००६,तसेच राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा आदर्श दुध संस्था सहकार भुषण पुरस्कार २०१७,सहकारी सर्वउत्कृष्टता पुरस्कार २०२१ आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

दूध उत्पादक गवळ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा गणेश दूध संस्थेचा प्रयत्न आहे असे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब हाडवळे यांनी सांगितले सूत्रसंचालन किरण औटी यांनी केले तर आभार सचिव निवृत्ती हाडवळे यांनी मानले.