अहमदनगर दि.(महेश कांबळे)अहमदनगर मंगल भक्त सेवा मंडळाच्यावतीने एमआयडीसीच्या एफ ७० या मंगल दत्त क्षेत्रात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त मंगळवार दि. १९ ते २५ डिसेंबर २०२३ या कालावधीत पुरातन मठात श्रीगुरूचरित्र पारायण होणार आहे
ज्यांना या सेवेत सहभागी व्हावयाचे असेल त्यांनी सर्व सेवेकरी ,सदस्य व भाविक-भक्तांनी मठातील चौकशी कक्ष येथे नावनोंदणी करावी अथवा मंडळाचे सेवेकरी क्षिरसागर मो. 8446456799 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंगल भक्त सेवा मंडळ (ट्रस्ट),अ.नगरचे अध्यक्ष श्री.राजाभाऊ कोठारी(श्री विश्वेश्वर स्वामी महाराज) व मंडळाने केले आहे
श्री गुरुचरित्र हा एकूणच दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे यामध्ये श्रीदत्त अवतारी श्रीगुरु विषयावर माहिती आहे गुरुचरित्रास दत्तसंप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात.मराठी गुरुचरित्रात अनेक पाठभेद आहेत. अशा अनेक पाठांच्या प्रतींचा तौलनिक अभ्यास करून गुरुचरित्राची एक प्रमाणित प्रत विसाव्या शतकात श्री.रामचंद्र कृष्ण कामत यांनी सिद्ध केली.कामत यांच्या प्रतीवर सायंदेव प्रतीचा गाढ ठसा दिसून येतो. कामत यांची प्रमाणित प्रत आणि वासुदेवानंद सरस्वती यांच्या परंपरेतले श्री वामनराव गुळवणी यांच्या वापरात असलेली चित्रशाळा प्रत या गुरुचरित्राच्या पाठासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय प्रती आहेत.
गुरुचरित्र या ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण,दत्तावतार चरित्र,श्रीपादश्रीवल्लभ चरित्र, नरसिंह सरस्वतींचे चरित्र आणि अवतरणिका असे विषय या ग्रंथामध्ये आहेत.श्रीदत्तात्रेयांचे अनेक अवतार झाले त्यात श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीगुरू नृसिंह सरस्वती या दोन थोर अवतारी पुरुषांच्या कार्यामुळे दत्तोपासना सर्वत्र पोहोचली. त्यातील श्रीनृसिंह सरस्वतींचे कार्य फारच मोठे आहे.त्यांच्या वास्तव्यामुळे औदुंबर,गाणगापुर,नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी) यांना तीर्ह्क्षेत् माहात्म्य प्राप्त झाले आहे.श्रीगुरुचारीत्रात या दोन अवतारी पुरुषांचे जीवनकार्य, त्यांनी केलेले चमत्कार,त्यांनी केलेला अनेकांचा उद्धार,त्यांनी केलेला उपदेश इत्यादी अनेक कथा माध्यमातून आलेले आहेत. या ग्रंथाचे साप्ताह पारायण होते
श्रीगुरुचरित्र ही कामधेनू आहे. तो कल्पतरू आहे. याच्या श्रवण-पठणाने अनेक फायदे होतात.या ग्रंथाच्या श्रवण-पठणाने गुरुकृपा प्राप्त होते.सर्व संकटाचा परिहार होतो. महापातकांचा नाश होतो. प्रयत्नांना यश येते.आरोग्यप्राप्ती होते.विद्याध्यायनात प्रगती होते.साधूसंतांचा सहवास लाभतो.घरातील वादविवाद नाहीसे होतात. संकटकाळी धैर्य येते. अशी भाविकांची श्रद्धा आहे मात्र त्यासाठी सदाचरण आणि श्रीगुरुंवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आवश्यक आहे.