अहमदनगर(महेश कांबळे)ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर शहरात ओबीसी महानगर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी नगर जिल्हात सर्वत्र ओबीसी समाज एकवटला आहे.
ओबीसी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन न्याय हक्कासाठी लढा द्यावा. ओबीसी समाजाच्या भवितव्यासाठी ओबीसी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे.ओबीसी समाजाच्या चळवळीत युवकांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले आहे.
बागडपट्टी येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात सकल ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या महाएल्गार मेळाव्याच्या नियोजनासाठी साळी समाजाच्या बैठक प्रसंगी भगवान फुलसौंदर बोलत होते.
यावेळी बाळासाहेब बोराटे,निलेश चिपाडे,अर्जुनराव बोरुडे,अमोल भांबरकर,स्वकुळ साळी संवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख अरविंदराव धिरडे,गणेश झिंजे,अभिजीत अष्टेकर,ज्ञानेश्वर फासे,सोमनाथ खाडे,जितेंद्र लांडगे,संजय सांगावकर,गजेंद्र सोनवणे,सुनील पावले,महेश कांबळे, अनिल भंडारी,योगेश भागवत,चंद्रकांत मानकर,परेश लोखण्डे, प्रकाश मारवाडे,सुमित धेंड,मनोज भुजबळ आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात एसबीसी समाज हा वेगळे आरक्षण असले तरी केंद्रात तो ओबीसी धरला जातो त्यामुळे ३ तारखेच्या मेळाव्यास एसबीसी समाजातील साळी,कोष्टी,पद्मशाली समाजातील लोक मोठया संख्नेने उपस्थित राहतील असे साळी पदाधिकार्यांनी यावेळी सांगितले.