पांगरे | शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या विचारांची उकळण करत, प्रदूषण मुक्त म्हणजेच ना कोणता डीजे ना फटाक्यांची आतषबाजी तर त्यांच्या विचारांचा आत्मसन्मान करत मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी केली.बाळासाहेब गुटाळ यांनी आपल्या भाषणातून सांगितले की ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले त्याप्रमाणे आपण सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन आपल्या गावाला उंची प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांनी शिवाजी महाराजांचा एक तरी गुण आत्मसात करून त्याचे आचरण करावे हा मोलाचा संदेश उपस्थितांना दिला. युवा उद्योजक अरुण शेंडगे यांनी पेढे वाटत सर्व गावकऱ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषीदुत शंभूराजे मस्के आदेश शेंडगे, सार्थक केतकर यांनी आपले मत व्यक्त केले.पांगरे गावचे सरपंच प्रा. विजया सोनवणे, अॅड. दत्तात्रय सोनवणे,उपसरपंच मनिषा गायकवाड,धनंजय गायकवाड ,ग्रामसेवक समाधान कांबळे,शाळा व्यवस्तापन अध्यक्ष महेश शेळके,ग्रा.स.सचिन पिसाळ महेश टेकाळे ,जल सुरक्षक गोपाल कोळी तसेच गावचे प्रतीष्टित ग्रामस्थ व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमासाठी संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सदगुरु कृषी महाविद्यालय मिराजगावचे संस्थापक शंकर नेवसे,अध्यक्षा कल्याणीताई नेवसे, सचिव राजेंद्रजी गोरे, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. के बिटे,कार्यक्रम अधिकारी प्रा. यादव एस.व्ही. व प्रा.काळे ऋषीकेश आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.