बकरीईद निमित्ताने सोमवारी बेल्हे बैलं बाजार राहणार बंद

आळेफाटा : बकरी ईद असल्याने,बेल्हे येथील आठवडे जनावरांचा बाजार बंद राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिस निरीक्षक होडगर म्हणाले की,सोमवारी बकरी ईद सण साजरा केला जाणार आहे.त्यात  महाराष्ट्रात प्राणी संरक्षण कायदयानुसार दुध देणाऱ्या गायी,म्हैस,बैल,रेडा,पारडी,वळु अशा गोवंश जनावरांची कत्तल व त्यांचे मांस वाहतुक करण्यास बंदी आहे.बकरी ईद सणाचे कत्तलसाठी जनावरांची मोठया प्रमाणात सोलापूर रोड,अहमदनगर रोड,सासवड रोड व नाशिक रोडने वाहतूक होऊन सदरच्या वाहतुकीस काही संघटनांकडून विरोध होऊन अटकाव होण्याची आणि त्याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यासाठी बकरी ईदचे दिवशी गोवंश जनावरांची कत्तल रोखण्यासाठी जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील जनावरांचा बाजार(दि.१७)रोजी बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आदेश दिला आहे.

सोमवारी बेल्हे येथील केवळ जनावरांचा बाजार बंद राहणार आहे.या आदेशाची पायमल्ली करून कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आणणाऱ्यावर कारवाई केली जाणार असा इशारा पोलिस निरीक्षक होडगर यांनी दिला.