शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दादाभाऊ मुलमुले

बेल्हे(प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या बेल्हे येथील प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी

दादाभाऊ शांताराम मुलमुले यांची एकमुखाने बिनविरोध निवड झाली.

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.सुप्रिया निवृत्ती बांगर यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.

बेल्हे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शुक्रवारी सायंकाळी शाळा व्यवस्थापन समिती निवड बैठक झाली. या बैठकीत शाळा व्यवस्थापन समितीसाठी चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश करण्यात आला आहे. 

मुख्याध्यापिका मीरा बेलकर,उपशिक्षक संतोष डुकरे,हरिदास घोडे यांच्या उपस्थितीत मावळत्या अध्यक्ष सुप्रिया बांगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अध्यक्षा दादाभाऊ शांताराम मुलमुले यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

या समितीत उपाध्यक्ष सोहेल बेपारी,सदस्य प्रितम मुंजाळ,शेखर पिंगट,संतोष पाबळे,संदीप खोमणे,सदस्या सौ.वैशाली पाबळे,राणी पारवे,शीतल गुंजाळ सचिव सौ.मीरा बेलकर यांचा समावेश आहे.