आळेफाटा(प्रतिनिधी)आळेफाटा पोलिसांनी परिसरात इलेक्ट्रिक केबलसह मोटारीच्या ताब्यांच्या तारा चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात यश मिळवले.त्यांच्याकडून ५लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
आळेफाटा पोलिस ठाण्यात आळे(ता.जुन्नर)शिवारात कोळवाडी येथे असलेल्या वीज वाहक टॉवर नंबर जी २८२ ते जी २८३ टॉवरला लावलेली ७४० मीटर ॲल्युमिनियम तार व स्पेस डेपरचे १२ नग हे ११ ते १९ सप्टेंबर दरम्यान कालावधीत अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची फिर्याद विभासकुमार भोला प्रसाद(रा.आळेफाटा)यांनी दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
आळेफाटा पोलिस पथकाने संशयित आरोपी म्हणून अभिजीत जयराम वाघ(रा.मांजरवाडी,ता.जुन्नर,जि.पुणे) याला ताब्यात घेतले.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सुरज खंडु विश्वासराव(रा.थोरांदळे,ता. आंबेगांव,जि.पुणे),सोहम ज्ञानेश्वर गोसावी(रा.खोडद,ता. जुन्नर,जि.पुणे)अजय संतोष भालेराव(रा.खोडद,ता.जुन्नर, जि.पुणे),दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने कोळवाडी येथील टॉवरवरील इलेक्ट्रीक तारांची चोरी केल्याची कबुली दिली.
संशयित आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी चोरलेले ॲल्युमिनियम तारा व डिपीमधील ताब्यांच्या तारा,गुन्ह्यात वापरलेली एक महींद्रा कंपनीची पिकअप गाडी पोलिसांनी जप्त केली.त्यांनी परिसरात ४ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.त्यांच्याकडून ५ लाख९३हजार५५० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश तायडे,सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे,विनोद गायकवाड,भिमा लोंढे,पंकज पारखे,अमीत पोळ,अमित माळुंजे, नविन अरगडे,गणेश जगताप,ओंकार खुणे,सचिन कोबल,गणेश सपकाळ या पथकाने ही कारवाई केली.