श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्सतर्फे शेतकरी सन्मान सोहळा; नव्या ट्रॅक्टरचे अनावरण

नारायणगाव : शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्सच्या वतीने भव्य शेतकरी सन्मान सोहळा व नवीन ट्रॅक्टर अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला. हा सोहळा सोमवारी (दि. २५ ऑगस्ट २०२५) सकाळी ९ वाजता पार पडला.

या कार्यक्रमात स्वराज ७३३ आणि ७३५ नव्या लूकमधील ट्रॅक्टर सहा वर्षांच्या वॉरंटीसह अनावरण करण्यात आले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांसाठी विशेष लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या शेतकऱ्यांना आकर्षक घरगुती वस्तू भेट देण्यात आल्या.

शेतकरी बांधवांची उपस्थिती पाहून सोहळ्याला उत्सवाचे स्वरूप आले. नवनवीन ट्रॅक्टरचे प्रदर्शन, कृषी क्षेत्रातील प्रगतीचे मार्गदर्शन आणि बालाजी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संतोष भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना दिलेले उत्तरे यामुळे कार्यक्रमाला माहितीपूर्ण व उपयुक्त असा रंग चढला.