समर्थ अभियांत्रिकीच्या ४० विद्यार्थ्यांची ‘क्यू स्पायडर’ व ‘दि किरण अकॅडमी’मध्ये भरघोस निवड

बेल्हे(प्रतिनिधी):समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंट, बेल्हे या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची ‘क्यू-स्पायडर’ व ‘दि किरण अकॅडमी’ या नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. ही माहिती अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे व कॉम्प्युटर सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. उत्तम शेलार यांनी दिली.

महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट सेलच्या वतीने नुकताच ‘कॅम्पस ड्राइव्ह २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत ‘क्यू स्पायडर’ व ‘दि किरण अकॅडमी’ या कंपन्यांनी कॉम्प्युटर, ईएनटीसी, एआय-एमएल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, MCA, MCS, BBA, BCA अशा विविध शाखांमधील विद्यार्थ्यांची निवड प्रक्रियेचे आयोजन केले.

‘क्यू-स्पायडर’ कंपनीकडून HR ट्रेनर आशिथा व ऐश्वर्या, तर ‘दि किरण अकॅडमी’कडून मुख्य कार्यकारी अधिकारी किरण दिगरसे व शाखा प्रमुख आनंद धाडगे यांनी मुलाखती घेतल्या. सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांची लेखी चाचणी व त्यानंतर गटचर्चा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी घेण्यात आली.

‘क्यू-स्पायडर’मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी:

प्रशांत लोखंडे, सुप्रिया सालके, सानिका लामखडे, वैभव भालेराव, पृथ्वीराज चव्हाण, हर्षा शिंदे, मानसी यादव, विश्वजीत राऊल, संग्राम देशमुख, सुदर्शन गवळी, विठ्ठल जाधव, वैष्णव जाधव, तौफिक पठाण, साजिदा पठाण, मानसी वायाळ, उमेश गोसावी, कुणाल बच्चे, अर्पिता लेंडे, प्रतीक भाईक, पूजा बढेकर, यश थोरात, गायत्री बोरुडे, रुपेश नवले, स्नेहल गाढवे, सिद्धी औटी, धीरज पाखरे.

‘दि किरण अकॅडमी’मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी:

समर्थ इंजिनिअरिंग कॉलेजमधून पृथ्वीराज चव्हाण, श्रुती गावडे, मानसी यादव, निकिता औटी, सुप्रिया सालके, राम इंगळे, वैष्णवी गायकवाड, अंकिता डोंगरे, जयेश आहेर, तेजस बाचकर,

तर कॉम्प्युटर सायन्स कॉलेजमधून हर्षदा वायकर, पायल लोंढे, सानिया पठाण या विद्यार्थ्यांची निवड झाली.

या यशस्वी कॅम्पस ड्राइव्हचे उत्कृष्ट नियोजन प्रा. सचिन पोखरकर (ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी), प्रा. स्नेहा शेगर (कॉम्प्युटर विभाग प्रमुख), प्रा. शुभम शेळके (AI & ML विभाग प्रमुख), प्रा. प्रशांत काशिद (BCS विभागप्रमुख) यांनी केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जि.प. सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर तसेच सर्व प्राचार्य, विभागप्रमुख व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.