मंचर(शरद घोडेकर):सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्कार फाउंडेशनचे सर्वेसर्वा व शरद बँकेचे संचालक उद्योजक अजय घुले यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल गोहे खुर्द येथे बेंचेस लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या सविताताई बगाटे होत्या. यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. मोहन साळी, शरद सहकारी बँकेचे संचालक प्रदीप आमुंडकर, उद्योजक शिवाजी गबाले, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेशभाऊ करवंदे, नरेश कसबे, श्री. बांबळे, औदुंबरेश्वर आदिवासी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक औदुंबर दत्तू सरवदे यांनी अजय घुले यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. तसेच विद्यालयातील भव्य क्रीडांगण, निसर्गरम्य वातावरण, संगणक प्रयोगशाळा, अनुभवी शिक्षकवर्ग, शंभर टक्के निकालाची परंपरा यांची माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मीना बोरसे यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश ढोबळे यांनी मानले. शेवटी ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी यांनी अजय घुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पालक व मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.