बेल्हे:-जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आळेफाटा परिसरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.
आळेफाटा,बेल्हे,आळे,राजुरी,पिंपळवंडी,पिंपरी पेंढार तसेच परिसरातील गावांमध्ये सकल जैन समाजाच्या वतीने भक्तीभावाने जयंती साजरी करण्यात आली.
बेल्हे येथे काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा विशेष आकर्षण ठरली.
भगवान महावीरांच्या प्रतिमेसह निघालेल्या या मिरवणुकीत बॅन्ड पथक,पारंपरिक वेशातील जैन बांधव, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “भगवान महावीरांचा जयघोष”करत ही शोभायात्रा लक्ष्मी रोड,चांदणी चौक,श्रीराम चौक,हनुमान चौक,बाजारपेठ, पोळेश्वर चौक मार्गे फिरून महावीर भवन येथे विसर्जित झाली.
या शोभायात्रेत संजय चंगेडिया,स्वप्नील भंडारी,पारसशेठ चंगेडिया, अशोक पोखरणा,रायचंद गांधी,अतुल सेलोत, दिलीप सेलोत, अतुल गांधी,सुभाष पोखरणा, परेश वखारिया, आनंद गुगळे, सनी भंडारी, गणेश पोखरणा, संतोष भंडारी, शुभांगी सेलोत, पल्लवी भंडारी यांच्यासह अठरा जैन कुटुंबांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
तसेच आळेफाटा परिसरातील कार्यक्रमात महावीर पोखरणा,विमलेश गांधी,सौ.सोनाली सुमतीलाल गांधी, रवींद्र चंगेडिया, पंकज चंगेडिया,नेमिचंद गांधी,सुंमतीलाल गांधी,संजय गांधी,विनोद(काका)गांधी,डॉ.राकेश गांधी, बाळासाहेब सेलोत,प्रवीण लोढा,डॉ.शिरीष गांधी यांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.
आळेफाटा,आळे,राजुरी,आणे,पिंपळवंडी व पिंपरी पेंढार येथेही शोभायात्रा,धार्मिक प्रवचने,पूजाअर्चा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी अन्नदान,आरोग्य शिबिरे व सेवा कार्य राबविण्यात आले.
आळेफाटा परिसरात महावीर जयंतीनिमित्त धार्मिक एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि अहिंसेचा संदेश देणारे उत्साही वातावरण निर्माण झाले होते.