नारायणगावात मोठी कारवाई : १२ बेकायदेशीर तलवारींसह तरुण अटकेत

नारायणगाव, दि. — पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगाव येथे धडक कारवाई करत १२ बेकायदेशीर तलवारी जप्त केल्या असून एका तरुणास अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर विभागाचे पथक नारायणगाव परिसरात पेट्रोलिंग करत होते.
दरम्यान, सहायक फौजदार दीपक साबळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, सालीम साजिद पठाण (वय २०, रा. शिपाई मोहल्ला, जुन्नर) हा त्याच्या ताब्यातील सुझुकी एस्टीम (MH 12 DE 2767) या कारमधून नारायणगाव येथे येणार असून गाडीत तलवारी आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष गाडीची झडती घेतली असता १० मोठ्या व २ लहान अशा एकूण १२ तलवारी आढळून आल्या. पोलिसांनी तत्काळ गाडी व तलवारी जप्त केल्या.
या प्रकरणी पोलिस अंमलदार अक्षय नवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६०/२०२६, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४, ५(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, प्रविण सपांगे, पोसई जगदेव पाटील, सहा. फौजदार दीपक साबळे, पोहवा संदीप वारे, राजू मोमिन तसेच पोशी अक्षय नवले, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, मंगेश लोखंडे यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
परिसरात समाधानाची भावना
या कारवाईमुळे नारायणगाव व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. बेकायदेशीर शस्त्रांवर आळा बसवण्यासाठी अशा कारवाया सतत सुरू राहाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आ