आळेफाटा(प्रतिनिधी)आळेफाटा पोलिसांनी बोरी बुद्रुक (ता.जुन्नर)शिवारातील ठाकरवाडीत टाकलेल्या छाप्यात विक्रेत्याला अटक करून ५ लाख ३६ हजार किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला.
जुन्नर न्यायालयाने संशयित आरोपी सुरेश मनोहर केदारी यांना न्यायालयीन कोठडीत ठेवले असल्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले.
आळेफाटा पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांना एक एप्रिलला खबऱ्याकडून बोरी बुद्रुक शिवारातील ठाकरवाडीत सुरेश मनोहर केदारी यांच्या घरात गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली.
पोलिस अधीक्षक डॉ पंकज देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर,पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने टाकलेल्या छाप्यात १७ किलो ८६५ ग्रॅम वजनाचा अंदाजे ५ लाख ३५ हजार ९५० रुपये किंमतीचा गांजा आढळून आला.
आळेफाटा पोलिसांनी संशयित आरोपी सुरेश मनोहर केदारी(वय ३५ वर्षे,रा.बोरी बुद्रुक,ठाकरवाडी ता.जुन्नर) यांना अटक करून जुन्नर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.