परमपूज्य सद्गुरु किसन बाबा चौरे यांच्या विसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने पारनेर शहरांमध्ये फुलला भक्तीचा मळा !

पारनेर:परमपूज्य सद्गुरु किसन बाबा चौरे यांच्या विसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने पारनेर शहरांमध्ये फुलला भक्तीचा मळा !

कोल्हापूर सातारा सांगली या पश्चिम महाराष्ट्रातून गुरु दर्शनासाठी आध्यात्मिक ज्ञानाचा आस्वाद घेण्यासाठी पारनेर येथे जमला हजारो भाविक भक्तांची उपस्थिती !

श्री.सत्य अविनाश पारखपद मंडळाचे मुख्य तीर्थक्षेत्र असणाऱ्या वडगाव सावताळ पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो भावी भक्तांची दर्शनासाठी मांदियाळी !

पारनेरच्या बाजारपेठेतून सद्गुरु प्रतिमेची ढोलकी डप तुंतुनेच्या माध्यमातून शाहिरी भेदिक भजनाच्या गजरात निघणार भव्य मिरवणूक !

पारंपारिक कलगीतुरा या लोककलेच्या माध्यमातून पारनेर शहरात शेकडो टीव्ही कलावंत व मान्यवर शाहीर राहणार उपस्थित !

मिरवणुकीनंतर महापूजा व महाप्रसाद झाल्यानंतर संपूर्ण रात्रभर चालणार आध्यात्मिक कलगीतुऱ्याचा शाहीरी कार्यक्रम !

अविनाश पारख समाज महाराष्ट्र राज्यच्या वतीने गुरु गादीचे चालक परमपूज्य सद्गुरु बबनदादा चौरे व ज्येष्ठ शाहीर निजामभाई शेख यांनी या भक्तीमय सोहळ्यात सहभाग नोंदवण्याचे भाविक भक्तांना केले आवाहन !