अंधश्रद्धा निर्मुलनासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे -योगेश सोनवणे

पिंपळवंडी(विजय चाळक):
विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करावेत असे विचार योगेश सोनवणे यांनी मांडले
चाळकवाडी ( ता जुन्नर) येथील शिवांजली विद्या निकेतन व यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती व करीअर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते
यावेळी विद्यालयाचा माजी विद्यार्थी सचिन सोनवणे यांनी करिअर या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की आपण कोणतीही गोष्ट करत असताना ती मनापासून व जीवनासाठी उपयोग होईल अशा प्रकारे करावी तर डाॅ निलेश पायमोडे यांनी व्यसनाधीनता व करिअर या विषयावर मार्गदर्शन केले या प्रसंगी सेवानिव्रुत्त मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे प्रदीप वायकर दत्तात्रय वामन निलेश वामन मंगेश वाकचौरे चांगदेव सोनवणे मुख्याध्यापक बी आर चासकर जिल्हा परिषद मुख्याध्यापिका वैशाली शिंदे शिवांजली प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली चासकर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक कु-हाडे प्रास्ताविक वैशाली शिंदे यांनी केले तर आभार स्वाती गायकवाड यांनी मानले