छत्रपती संभाजीराजे पतसंस्था अल्पावधीतच विश्वासास पात्र-बाबाजीशेठ भंडारी

पारनेर(श्रीकांत चौरे): पारनेर येथील तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या छत्रपती संभाजीराजे पतसंस्थेने काटकसरीच्या पारदर्शक कारभाराने व देत असलेल्या उत्कृष्ठ सेवेने तालु क्यात नावलौकिक मिळवला असून ही पतसंस्था ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरली असल्याचे प्रतिपादन अळकुटीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष , जेष्ठ नेते बाबाजी शेठ भंडारी यांनी संस्थेच्या अळकुटी शाखेच्या स्थलांतर व प्रथम वर्धापन दिन प्रसंगी व्यक्त केले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा शिवसेना नेते डॉ . भास्कर शिरोळे हे उपस्थित होते .यावेळी प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक , चेअरमन संभाजी औटी यांनी केले . यावेळी त्यांनी सांगितले की संस्थेने काटकसर , पारदर्शक कारभार व उत्कृष्ठ सेवेच्या जोरावर अकरा कोटींचा टप्पा ओलांडलेला असून संस्थेचे कामकाज पूर्णतः संगणकीकृत आहे . सहा शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट , क्यू आर कोड सुविधा , मिनी एटीएम , एनईएफटी , आरटीजीएस सुविधा , आय . एम .पी एस सुविधा , एसएमएस सुविधा , संस्थेमार्फत देण्यात येवून उत्कृष्ठ वसूली मुळे एनपीएचे प्रमाण अत्यंत कमी आहे .

संस्थेने अवसायानात गेलेल्या गोरेगाव येथील भाग्योदय व धोत्रे येथील लोकमान्य या पतसंस्थांचे विलिनीकरण करून घेऊन त्यांच्याही वसूली ची प्रक्रिया कायदेशीर पूर्ण करून त्यांची वसूली ऐंशी टक्के पूर्ण केलेली आहे . ठेववाढी साठी संस्थेने शंभूराजे लक्षाधीश योजना , रिकरिंग ठेव ,मुदत ठेव या सारख्या योजना संस्थेने सुरू केलेल्या आहेत . संस्थेने अनेक छोटे व्यावसायिक , उद्योजक , महिला बचत गट , दुधधंद्यासाठी अनेक प्रकारच्या कर्ज व्यवस्था उपलब्ध करून दिलेल्या असल्याचेही औटी यांनी सांगितले .यावेळी उपसरपंच आरिफ पटेल , माजी शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर झावरे , वि .का . सेवा संस्थेचे चेअरमन सुभाष पुंडे , माजी चेअरमन बाळासाहेब पुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमासाठी जेष्ठ नेते रामदास भंडारी , सरपंच कोमल भंडारी , उद्योजक दिनेश शिरोळे , माजी मुख्याध्यापक विश्वनाथ कवडे , पांडुरंग कवडे, कलाशिक्षक रामदास कवडे , आदर्श शिक्षक वसंत सोनवणे , गोरक्ष पावडे ,हेमंत हिंगमिरे , पंकज झरेकर , भास्कर ठुबे , तुकाराम झिंजाड , बाळासाहेब पडवळ , विकास जाधव , अशोक डेरे , रामदास नरसाळे , संदीप रेपाळे व अळकुटीचे ग्रामस्थ ,व्यापारी संस्थेचे ग्राहक आदि उपस्थित होते .सर्व मान्यवरांचे स्वागत संस्थेचे मॅनेजर सुरेश ठुबे यांनी केले . शेवटी आभार हेमंत हिंगमिरे यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखाधिकारी तुषार ठुबे , वसूली अधिकारी मनोज जाधव , संस्थेचे कर्मचारी सर्वश्री .रविंद्र बोरुडे , पल्लवी रोकडे , संगिता चौधरी यांनी परिश्रम घेतले .