पळशी सेवा सोसायटी चेअरमन पदी राजेंद्र बिलबिले तर व्हा.चेअरमन पदी सौ.चंद्रकला गागरे यांची बिनविरोध निवड

पारनेर(श्रीकांत चौरे): पळशी विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटी मर्या,पळशीच्या चेअरमन पदी श्री .राजेंद्र रविंद्र बिलबिले यांची तर व्हा.चेअरमन पदी सौ.चंद्रकला शिवाजी गागरे यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी पारनेर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मा श्री निलेशजी लंके साहेब यांच्या हस्ते नवनिर्वाचीत चेअरमन व्हा .चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला .


पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष श्री.नितीन अडसूळ,मा .सरपंच राहुल झावरे मा उपसरपंच आप्पासाहेब शिंदे बाजार समितीचे संचालक श्रीरंग रोकडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले . तसेच आमदार साहेबांनी सोसायटी इमारती साठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यापुढे आम्ही मा आ निलेशजी लंके साहेब, श्री.आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करुण सर्व संचालक मंडळाला सोसायटी कामकाजा मध्ये सोबत घेऊन सभासद हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांची कामधेणू असलेली सोसायटीचा नावलौकीक वाढेल असे काम करणार असल्याचे नवनिर्वाचीत
चेरमन, व्हा .चेरअमन यांनी सांगितले .