‘जगदंब प्रतिष्ठान’ आयोजित महारक्तदान यज्ञात जुन्नर तालुक्यात १२५० जणांचा सहभाग

नारायणगाव – क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘जगदंब प्रतिष्ठान’ने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराला जुन्नर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील २१ ठिकाणी आयोजित केलेल्या या शिबिरात १२५० पिशव्या रक्त संकलन झाले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातातील जखमींना ऐनवेळी आर्थिक चणचणीमुळे उपचार घेण्यात अडचणी येतात. खासदार डॉ. कोल्हे यांनी या अडचणींचा अभ्यास करुन त्यावर मार्ग काढण्याचा आगळावेगळा केलेला प्रयत्न म्हणजे आजचे महारक्तदान शिबिर असं म्हणता येईल. या शिबिरात सहभागी रक्तदात्यांना ३ लाखांचा अपघाती विमा आणि ३ लाखांचा जीवन विमा असे एकूण ६ लाखांचे विमा कवच मिळणार असल्याने तरुणांनी आवर्जून रक्तदान करुन या संधीचा फायदा घेतला.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या संकल्पनेतून ‘जगदंब प्रतिष्ठान’ने संपूर्ण शिरुर लोकसभा मतदारसंघात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले असून जुन्नर तालुक्यात या शिबिराचे उद्घाटन आमदार अतुल बेनके यांच्या शुभहस्ते मुक्ताई समाज मंदिर, नारायणगाव येथे पार पडले. याप्रसंगी अमित बेनके, गणेश वाजगे, रोहिदास केदारी, रामदास अभंग, तानाजी डेरे, एकनाथ शेटे, सूरज वाजगे, राजाभाऊ कोल्हे, विलास पाटे, राजश्रीताई बोरकर, सुजित खैरे आदी उपस्थित होते तर उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ नागरिक शंकरनाना कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा गायला आणि स्थानिक कलाकारांनी दिवसभर देशभक्तीपर गीते गाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

डॉ . घनश्याम राव यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. कोल्हे यांचे ज्येष्ठ बंधू सागरदादा कोल्हे, अतुल आहेर, आशिष हांडे, तेजस झोडगे, तुषार डोके, यज्ञेश आवटी यांनी सर्व केंद्रांना भेटी दिल्या. रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यासाठी सत्यशीलदादा शेरकर, शरद लेंडे , वैभव तांबे, मोहित ढमाले, तुषार थोरात, विक्रम भोर, गणपत कवडे, गणेश कवडे, जितेंद्र बिडवई, प्राचार्य महादेव वाघमारे, प्राचार्य डॉ. राजेंद्र मुरादे, भाऊ देवाडे, अजयनाना कुऱ्हाडे, डॉ. शुभम कणसे, डॉ. खोकराळे, डॉ. आनंद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. अभय खंदगले, वैभव काळे, अमोल कोरडे, विजय कुऱ्हाडे, अशोक घोडके, साईनाथ ढमढेरे, वैभव कोरडे, संजय वारुळे, विनायक भुजबळ, मंगेश मुळे आदींनी सहकार्य केले.