पारनेर(प्रतिनिधी):राज्याचे अर्थ खाते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे आल्यानंतर विधानसभेतील त्यांचे निष्ठावंत सहकारी समजले जाणारे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या मतदार संघासाठी भरीव निधी खेचून आणण्यात यश मिळवले .
संपूर्ण मतदार संघातील कुठल्या गावात अनेक दिवसाचे प्रलंबित कामे आहेत त्याकडे विशेष लक्ष देत कोट्यावधी रुपयाचा निधी देत तालुक्यातील प्रलंबित कामांचा अनुशेष भरून काढला .
पिंपरी जलसेन मधील खंडोबा मंदिर आणि कदम मळा या परिसरात कित्येक वर्षा पासून प्रलंबित असलेल्या कामांसाठी पिंपरी जलसेन मधील ज्येष्ठ आणि युवा मंडळींनी आमदार निलेश लंके यांची भेट घेऊन विविध विकास कामांसंदर्भात मागणी करत निवेदन दिले. त्यात खंडोबा मंदिर परिसर विकासासाठी 12 लक्ष रुपयांची मागणी केली होती .परंतु ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून सदर कामासाठी 25 लक्ष रुपये निधी देण्याचे आ. लंके यांनी कबूल केले .

त्याच प्रमाणे खंडोबा मंदिर ते गायघाट बाबा रस्ता मातोश्री शेतपानंद योजने तून मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करणार असे ठोस आश्वासनही दिले आहे.
आमदारांना पहिल्यांदाच येवढ्या जवळून भेटण्याचा अनुभव विलक्षण आनंद देऊन जाणारा होता,असे ज्येष्ठ मंडळींचे मनोगत होते .
आमदारांचा साधे आणि सरळ पणा ज्येष्ठ मंडळींना चांगलाच भावला.मागणी पेक्षा आमदारांनी आम्हाला जास्त दिले
सर्व ज्येष्ठ मंडळींची आदराने विचारपूस केल्यामुळे सर्व मंडळी मनोमन सुखावले.
पिंपरी जलसेन गावाच्या विविध प्रलंबित प्रश्न संदर्भात सामजिक कार्यकर्ते विनोद कदम यांनी वारंवार आमदार लंके यांच्याशी संपर्क केलेला होता .परंतु गेले एक वर्षभर राज्याच्या सरकारमध्ये सत्ताधारी म्हणून सामील नसल्यामुळे सदर कामे देण्यास विलंब झाला . तेव्हा विनोद कदम यांनी गावातील वृद्ध मार्गदर्शक व युवा सहकारी यांचे एक शिष्टमंडळ आमदार निलेश लंके यांना भेटले.व त्यांच्या मागणीचा विचार करत त्यांच्या अपेक्षा पेक्षाही दुप्पट निधी आमदार लंके यांनी गावासाठी दिला त्यामुळे पिंपरी जलसेन ग्रामस्थांकडून आमदार लंके यांचे आभार व्यक्त करत साधा व सरळ आमदार तालुक्याला मिळाला असे कौतुक केले .
या वेळी सामजिक कार्यकर्ते विनोद कदम,गणपत कदम,नानाभाऊ कदम,रामदास बोरुडे,दादाभाऊ कदम,देवेंद्र भंडारी,नामदेव विष्णू कदम,बाबाजी कदम,नामदेव भिकाजी कदम,शिवाजी बोरुडे,भाऊसाहेब बोरुडे,सुखदेव कदम सर, ज्ञानदेव कदम,रेवजी कदम,दादाभाऊ बोरुडे सर, मच्छिंद्र कदम, शंकर बोरुडे,बाबाजी वाढवणे,रमाकांत कदम,अक्षय बोरुडे,दीपक कदम या सह पिंपरी जलसेन गावातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते .