पारनेर(श्रीकांत चौरे):इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड कडून घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय मॅथ्स ऑलिम्पियाड स्पर्धेत कळंबोली कारमेल कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी वृत्तांत नाना करंजुले याने गोल्ड मेडल ची कमाई केली आहे. त्याने राज्यात 16 वा रँक प्राप्त करून एक्सलंट अच्युमेंट अवार्ड पटकावला आहे. याबद्दल त्याचे शाळे कडून अभिनंदन करण्यात आले आहे. करंजुले हा मूळचा पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील रहिवासी आहे
ऑलिंपियाडही स्पर्धात्मक चाचण्यांची एक मालिका आहे जी मुख्यतः विज्ञान, गणित इत्यादी क्षेत्रांमध्ये दिली जाते. ही चाचणी इयत्ता १ ते १२ मधील विद्यार्थ्यांना दिली जाते. ऑलिम्पिक स्पर्धा राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर आयोजित केल्या जातात. ऑलिम्पियाड परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षांपैकी एक होय. या परीक्षांना पास करणे विद्यार्थ्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. या आव्हानात्मक परीक्षेमध्ये सहभागी झाल्यानंतर मुलांना त्यांची ध्येय आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी मदत होते.ही परीक्षा प्रतिष्ठीत आणि आव्हानात्मक समजले जाते. देशपातळीवर काही महिन्यांपूर्वी इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड कडून परीक्षा घेण्यात आले होते. मॅथेमॅटिक्स मध्ये कारमेल कॉन्व्हेंट हायस्कूल मध्ये इयत्ता चौथी शिकणाऱ्या वृत्तांत नाना करंजुले याने बाजी मारली आहे. हजारो विद्यार्थ्यांमधून त्याने महाराष्ट्रात 16 वी रँक घेतली आहे. सुवर्णपदक आणि सर्टिफिकेट देऊन 11 ऑगस्ट 2023 रोजी वृत्तांतला सन्मानित करण्यात आले. याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकाने त्याचे अभिनंदन केले. त्याचबरोबर पनवेलचे गटशिक्षणाधिकारी सिताराम मोहिते, शालेय पोषण आहार अधीक्षक नवनाथ साबळे, माजी नगरसेवक सतिश पाटील वृत्तांत करंजुले या यशाबद्दल कौतुक करून पुढील परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या.