पारनेर(श्रीकांत चौरे): आपल्या सामाजिक कार्यामुळे नेहमीच महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेले पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक व परोपकारी कार्याची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रभर त्यांचा मोठा चाहता वर्ग प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार झाला आहे .आमदार निलेश लंके यांचा सर्व सामान्य , दुर्बल घटक , अपंग व गोर -गरीब जनतेसाठी दिलेला मदतीचा हात व त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर हजारो लोकांच्या समस्यांचे झालेले निराकरण पाहता ,आनेक जिल्ह्यामध्ये निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा पिढी सामाजिक कार्य करताना दिसून येत आहे.
हरवत चाललेली संवेदना जपनारे आमदार निलेश लंके यांच्या विचारावर प्रेरित होऊन समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो या भावनेतून आमदार निलेश लंके यांच्या पाऊलावर पाऊल टाकत पंढरपूर येथील युवा नेतृत्व श्री.नवनाथ बागल हे निलेश लंके प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने आ. लंके यांचा सामाजीक कार्याचा वारसा जतन करत आहेत .

एक विद्यार्थी गणवेश घेण्याकरता श्रीनाथ मॉल,पंढरपूर येथे गेला होता .परंतु त्याच्याकडे गणवेष घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्या कारणाने तो गणवेश घेऊ शकला नाही .तो विद्यार्थी तिथून बाहेर पडत असताना, बाहेर उभे असलेले नवनाथ बागल याच्याकडे त्याची नजर गेल्यानंतर चौकशी केल्यानंतर बागल यांच्या सर्व प्रकार निदर्शनास आला .
आमदार निलेश लंके यांचे सामाजिक कार्य अगदी जवळून पाहिलेल्या बागल यांना त्या मुलाकडे पाहताच आमदार निलेश लंके यांची आठवण झाली व तात्काळ नवनाथ बागल त्या विद्यार्थ्याला श्रीनाथ मॉलमध्ये घेऊन गेले व त्या विद्यार्थ्याला गणवेश तर दिलाच व चौकशी करत त्या गावातील गरीब व गरजू कुटुंबातील ईतर विद्यार्थ्यांनाही गणवेश घेऊन दिला.आज समाजामध्ये विषमतेची दरी रुंदावत चालली आहे.एकीकडे श्रीमंतांची संख्या वरचेवर वाढतच चालली आहे तर दुसऱ्या बाजूला गरीबीची दरीही वाढत चालली आहे. पण समाजामध्ये अनेक चांगल्या प्रकारची लोक ही आढळून येतात.
आजकाल समाजात आपण सर्वत्र बघतोय मोलमजुरी करणाऱ्या गरीब जनतेची संवेदना हरवल्याचे दिसून येत आहे ? मुलचा बुद्ध्यांक चांगला आसला तरी परिस्थितीमुळे त्याच्या पालकाला त्या मुलाला दर्जेदार शिक्षण देता येत नाही .ही भिषण वास्तवता पाहता आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक कार्याचा आल्पसा भाग म्हणून नवनाथने आपल्याच गावातील गरीब विद्यार्थ्यांप्रती जी सामाजीक बांधीलकी दाखवली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे.ज्या समाजात आपण वाढलो त्याचे आपण काहीतरी देणे लागतो, याचे भान जर प्रत्येकाने ठेवले तर नक्कीच समाज बदलायला वेळ लागणार नाही.समाजाला उपदेशाचे ढोस देत बसण्यापेक्षा प्रत्येकाने ही सुरुवात आपल्या स्वतःपासून करायला हवी. आसे भावनिक होत नवनाथ बागल यांनी सांगीतले .
मी आमदार लंके यांच्या प्रमाणे आल्पसे सामाजीक कार्य करतो आहे. व यापुढेही निस्वार्थपणे करनार आहे .मला कुठलीही प्रसिद्धी नको आसे विनम्रपणे सांगनारे नवनाथ बागल यांनी कुठलीही प्रसिद्धी नको आसे निक्षून सांगीतले आसले तरीही त्यांचे सामाजीक कार्य पाहता विद्यार्थ्यांना गणवेश देऊन त्यांनी कसलाही स्वार्थ न ठेवता आपले सामाजीक दायित्व पार पाडले म्हणून ईतर युवावर्गाला सामाजीक कार्याची प्रेरणा मिळावी म्हणून ही प्रसिद्धी दिली जात आहे .
देश स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे .तर त्या दिवशी त्यांना नवीन कपडे असायला हवीतच. म्हणून त्यांनी १४ ऑगस्ट रोजी गावातील गरीब विद्यार्थ्यांना गणवेषाचे वितरण केले .प्रत्येकाने जर अशा पद्धतीने समाजहिताचे कार्य करत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सामाजीक योगदान देत शासनाच्या विवीध योजना, रेशनकार्डस , संजयगांधी निराधार योजना आसो की कृषी संधर्भातील लाभाच्या योजनेत सहकार्याची भुमिका युवा वर्गाने मणी बाळगुण समाजकार्य केले तर समाजातील गरजू लोकांना त्याची मदत होईल आसा मानस ठेवत युवा वर्गाने योगदान दिले तरी गरीब – श्रीमंत यातील विषमतेची दरी नक्कीच कमी होईल व निलेश लंके प्रतिष्ठान पंढरपुरच्या माध्यमातून यापुढेही आमचे आसेच सामाजीक कार्य अखंडीत चालु राहील आसे यावेळी नवनाथ बागल यांनी सांगीतले .