अळकुटी(प्रतिनिधी):चोंभूत(ता.पारनेर)गावचे एक आदर्श व्यक्तिमहत्त्व रामचंद्र बाबुराव म्हस्के यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांचे वय ९४ वर्ष होते.
त्यांच्या पश्चात पाच भाऊ,भावजया,पुतणे,सुना,नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे.सध्याच्या युगातही त्यांचे नव्वद माणसांचे एकत्रित कुटुंब आहे.
चोंभूत गावचे माजी सरपंच तसेच चोंभूत कार्यकारी विविध विकास सेवा सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण म्हस्के व प्रसिध्द बैलगाडामालक मच्छिंद्र म्हस्के यांचे थोरले बंधू व विध्यमान सरपंच कांचनताई दत्तात्रय म्हस्के या त्यांच्या सुनबाई होत.
स्व.रामचंद्र बाबुराव म्हस्के यांचे रविवारी सकाळी ८ वाजता निधन झाले.चोंभूत गावासह परिसरात त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.