पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा निषेध

मंचर(प्रतिनिधी):निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल ५१ कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया पार पडल्या. बेड उपलब्ध नसल्यामुळे अनेक महिलांना जमिनीवर झोपवण्यात होते. या गोष्टीचे वृत्तांकन केले म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केले!

काही स्थानिक पुढाऱ्यांनी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संगनमत करून संबंधित पत्रकारांवर हा गुन्हा दाखल केला होता. या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या भूमिकेला समर्थन देत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा सह संपर्कप्रमुख ॲड. अविनाश रहाणे, जिल्हाप्रमुख सुरेश भाऊ भोर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर, माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख आणि माजी सरपंच दत्ताभाऊ गांजाळे, उपतालुका प्रमुख अमोल अंकुश, मंचर शहर प्रमुख विकास जाधव, घोडेगाव शहर प्रमुख नंदू बोऱ्हाडे, अक्षय कुलकर्णी, शंभू घोलप, राजू सोमवंशी, काँग्रेसचे तालुका प्रमुख राजूभाई इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मयुर भालेराव, हरी थोरात, विशाल वाबळे, अमोल बानखेले, आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सदानंद शेवाळे, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष मनोज तळेकर, माजी अध्यक्ष डॉ. अतुल साबळे, समर्थ भारत माध्यम समूहाच्या संपादिका स्नेहा बारवे, अमोल जाधव, स्वप्नील जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुकाध्यक्ष वैभव बाणखेले, आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार, वंचित बहुजन आघाडीचे पंकज सरोदे, शिवाजी राजगुरू, साधू लवांडे, शशिकांत भालेराव, राजमुद्रा प्रतिष्ठानचे संतोष खेत्री, अंकुश लोंढे गजानन राजगुरू पत्रकार किशोर वाघमारे, राजेश चासकर, अश्विन लोढा, धनंजय पोखरकर किशोर वाघमारे, दत्ता नेटके, संतोष गावडे, नवीन सोनावणे, नंदू पोखरकर, समीर गोरडे आदी मान्यवर उपस्थित होत आहे