नारायणगाव,दि.(प्रतिनिधी)कमरेला पिस्तूल हातात कोयता घेऊन रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या व नारायणगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
याबाबत सविस्तर माहिती अशी,नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील वारुळवाडी येथील ठाकरवाडीकडे जाणाऱ्या रस्यावर दि.२३ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास पांढर्या रंगाचे कपडे घातलेला एक इसम हा त्याचे हातातील कोयता व कमरेला पिस्तुल लावुन रस्त्यावर उभे राहुन हातवारे करून धाक दाखवुन दहशत निर्माण करत आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेची टीम तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी लागलीच पोलीस स्टाफसह सरकारी वाहनाने ठाकरवाडी रोड येथील घटनास्थळी जाऊन खात्री केली असता त्यांना एक इसम कमरेला पिस्तुल लावुन हातात कोयता घेऊन हातवारे करत असताना दिसल्याने पोलीस स्टाफने त्यास शिताफिने ताब्यात घेतले असून त्याचे नाव अनिल सुनील जाधव रा. ठाकरवस्ती, वारुळवडी, ता. जुन्नर असे असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचा पुढील तपास पोहवा दाते करत आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार,पोलिस उपनिरीक्षक विनोद धुर्वे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार दीपक साबळे, संदीप वारे,अक्षय नवले,मंगेश लोखंडे,शैलेश वाघमारे,दत्ता ढेंबरे यांच्या पथकाने केली.