आ.निलेश लंके यांच्या पुढाकाराने निलेश लंके अपंग प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

पारनेर येथे o८ सप्टेबर रोजी दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन

पारनेर(श्रीकांत चौरे): पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या संकल्पेतून तसेच निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनातून पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे शुक्रवार दिनांक 8 सप्टेबर रोजी अपंग बांधव तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात येणार असुन ,अपंग बांधव तपासणी शिबिरामध्ये संपूर्ण पारनेर तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांना नगर येथे जाऊन तपासणी करावी लागत आहे .अनेक दिव्यांग बांधवांना नगर सारख्या ठिकाणी जाऊन तपासण्या करणे प्रवास करणे हे फार मोठे दिव्य ठरते . याचा विचार करत निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील करंजुले यांनी अपंगाबद्दलची असणारी तळमळ व त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल आमदार निलेश लंके यांच्याशी चर्चा करत गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील अपंग बांधवांना नगरला जाण्याचा खर्च व वेळ वाचवण्यासाठी पारनेर मध्ये कॅम्प घेण्याचे सूचित केले व कुठलाही विलंब न करता आमदार लंके यांनी पुढाकार घेत या शिबिराचे आयोजन केले .यापूर्वी घेतलेल्या शिबिरात अनेक दिव्यांग बांधवांना त्याचा मोठा फायदा झाला असून यावेळेसही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळणार असा विश्वास उपाध्यक्षा सुनिता वाळेकर यांनी व्यक्त केला .
निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठान मार्फत राबविले जात असलेल्या उपक्रमात महत्वाचा उपक्रम म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र काढणे ते काढण्यासाठी दिव्यांगांची खूप फरफट होते त्यासाठी प्राधान्य क्रम देऊन 8 सप्टेबर रोजी ग्रामीण रुग्णालय पारनेर येथे शिबिचे आयोजन केले आहे .निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अपंग बांधवांसाठी अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात . त्यात निलेश लंके अपंग प्रतिष्ठान मार्फत विवाह नोंदणी, गरीब लोकांचे विवाह व आत्मनिर्भर दिव्यांग अंतर्गत प्रत्येक दिव्यांगस स्ववलंबी करण्याच्या दृष्टीने शिलाई कोर्स, बुनाई कोर्स, हस्तकला कोर्स, ऑनलाईन कोर्स इत्यादी उपक्रम प्रामुख्याने सांगता येतील .


UDID रजिशस्टेशन, जुने अपंग प्रमाणपत्र ऑनलाईन,नवीन अपंग प्रमाणपतत्र अपंग बांधवांना आपल्या तालुक्यात मिळण्यासाठी अध्यक्ष सुनील करंजुले यांनी दिव्यांग बांधवांना नगर येथे जाऊन हेलपाटे कमी करण्यासाठी जिल्हा रुग्णालय व निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठान आणि आधार दिव्यांग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी रोजी सकाळी ठीक 8 वाजता पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे दिव्यांग अपंग प्रमाणपत्र तपासणी,UID कार्ड रजिशसटेशन व नवीन प्रमाणपत्र यासाठी शिबिराचे आयोजन केले आहे तरी आपल्या ओळखीच्या जवळच्या सर्व दिव्यांगाणा पर्यंत याविषयी माहिती पोहोचविण्यासाठी या शिबिराचा सर्व दिव्यांगाना लाभ मिळावा म्हणून आपल्या गावातील प्रत्येक दिव्यांगा पर्यंत हि माहिती पाठवा व 08 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता पारनेर ग्रामीण रुग्णालय पारनेर येथे सर्व दिव्यांगानी उपस्थित राहून आपले दिव्यांग प्रमाणपत्र काढून घ्यावे आसे केले काही दिवसापासून प्रसार माध्यमांवर माहिती पोचवत आहेत . ज्यांना UID रजिष्टर करायचे आहे त्यांनी आधार कार्ड, अपंग प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो व सहीचा नमुना,आधार कार्ड,
रेशनकार्ड,अपंग प्रमाणपत्र ,हॉस्पिटल पेपर (अपघाती अपंगत्व असेल तर )
2 पासपोर्ट साईज फोटो
या शिबिरात जुने अपंग प्रमाणपत्र ऑनलाईन केले जाईल, नवीन अपंग प्रमाणपत्र काढले जाईल तेव्हा पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील ज्यांना अपंग प्रमाणपत्र मिळाले नसेल त्या सर्व दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा .असे आवाहन
निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठान, जिल्हा रुग्णालय अहमदनगर व आधार दिव्यांग ट्रस्ट कडून करण्यात येत आहे .

अपंग बांधवांच्या हेलपाटे थांबविण्यासाठी शिबीराचे आयोजन..

पारनेर तालुक्यातील अनेक गरजू अपंगांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात आठवड्यातील बुधवारी जावे लागत आहे.त्यामुळे या अपंग बांधवांना हेलपाटे मारावे लागत होते . त्यामुळे पारनेर तालुक्यातील अपंग बांधवांना हे प्रमाणपत्र मिळावे यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.