श्री समर्थ पॉलिटेक्निक मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

पारनेर प्रतिनिधी(श्रीकांत चौरे): 5 सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, शिक्षक दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. श्री समर्थ पॉलीटेक्निक मध्ये सुद्धा शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे मा. प्राचार्य पटारे सर व विविध विभागाचे विभाग प्रमुखांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. या शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना उद्योजकता विकास यात्रेच्या माध्यमातून उद्योगाकडे वळवण्याचे मार्गदर्शन तसेच उद्योगासाठीच्या असणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच महाविद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक मा.बाचकर सरांनी विद्यार्थ्यांना सृजनशील विद्यार्थी घडवण्याकरता मार्मिक शब्दात मार्गदर्शन केले.
विविध विभागातील विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले, तसेच सर्व शिक्षक वृंदांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनी शिक्षकदिना निम्मिताने डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करत त्यांना मानवंदना अर्पन करत कार्यक्रमची सांगता झाली.