पारनेर(प्रतिनिधी)श्रीकांत चौरे: पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते .सदर सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली . सेवा सोसायटीचे सचिव वेताळ भाऊसाहेब यांनी सर्वसाधारण सभेमधील विषय मांडले व सभासद यांनी सर्वांनी एकमताने विषय मंजूर केले .
सभेमध्ये सर्व सभासदांच्या एकमताने नफा (लाभांश)हा 12% वाटण्याचे ठरले असुन प्रत्येक वर्षी नफा वाटप १२% होत असून ही पारनेर तालुक्यातील एकमेव संस्था आहे.असे यावेळेस श्री वेताळ यांनी सांगितले .यामध्ये सेवा सोसायटी संचालक सुदर्शन कारखिले यांनी लक्षवेधी मांडत चेअरमन शीलाताई सुखदेव कारखिले यांच्या कार्यकाळात सेवा सोसायटी ला “अ ” वर्ग दर्जा प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन करण्याचा ठराव मांडला तसेच पाठीमागील कार्यकाळात चांगल्या स्वरूपाचे काम करणारे चेअरमन अंकुशराव कारखिले,बाळासाहेब कारखिले,भरतशेठ शितोळे यांचे कौतुक केले.
चेअरमन अंकुशराव कारखिले व व्हा चेअरमन संजय कारखिले यांच्या कार्यकालमध्ये लॉकर सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक सुदर्शन कारखिले यांनी केले.यावेळी राळेगण थेरपाळ वि का से सो चे बहुसंख्य सभासद उपस्थीत होते .