पुरंदर(प्रतिनिधी): जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 232 वी शासकीय जयंती सोहळ्यानिमित्त भिवडी तालुका पुरंदर या ठिकाणी समाजभूषण पुरस्काराचे वाटप करण्यात आले
त्यात सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बबन शिरतर यांना आ.राहुल कुल,आ.गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे, आमदार राहुल कुळ,आमदार गोपीचंद पडळकर,अंकुश जाधव,रोहिदास मदने,सुधीर नाईक,सनी खंडागळे,सुनील माखरे, अप्पा बोरुडे,संदीप शितोळे,गणेश शिरतर,आदी मान्यवर उपस्थित होते