आळेफाटा(प्रतिनिधी):आळेफाटा येथील विश्वकर्मा सहकारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला.साईलीला गार्डन मंगल कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष हरिदास ताजवे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या वर्षी संस्थेला ११ लाख ५७ हजार रुपयांचा नफा झाला असून ठेवी ८ कोटी ९ लाख रुपयांच्या वर आहेत.
संस्थेचे भाग भांडवल १ कोटी असून वसूल भाग भांडवल ६३ लाखवर आहे. तर संस्थेचे सभासद संख्या ९२१ आहे.वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक सचिव सुनील जाधव यांनी केले तर अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी विलास डावखर यांनी केले. संस्थेच्या सभासद प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर यांनी केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष हरिदास ताजवे यांना अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाजाच्या वतीने समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल व संस्थेचे सचिव सुनील जाधव यांची आळे ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी संस्थेच्या विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा मंगलताई दिवेकर संचालक रामदास राऊत, रोहित जाधव, देविदास ताजवे, विलास जाधव, जयहिंद भूतांबरे, बाळासाहेब गाडेकर, रामदास भालेराव, नितीन भद्रिगे, रवींद्र वाव्हळ उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार संस्थेचे अध्यक्ष हरिदास ताजवे यांनी मानले.