वडगाव आमली चे गणेश डेरे यांना राष्ट्र निर्माता आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

पारनेर(श्रीकांत चौरे) : तालुक्यातील वडगाव आमली येथील रहिवासी व सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानगुडवाडी, ता-कर्जत येथे कार्यरत असणारे प्राथमिक शिक्षक गणेश भाऊसाहेब डेरे यांना यांना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी यांच्या वतीने आदर्श शिक्षकांना दिला जाणारा राष्ट्र निर्माता पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नगर येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात रोटरी चे जिल्हा संचालक डॉ.दादासाहेब करंजुले, शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री कार्ले यांच्या हस्ते गणेश डेरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी निवृत्त नायब तहसीलदार.भाऊसाहेब डेरे ,.आशा डेरे,प्राथमिक शिक्षिका तेजश्री डेरे, , नागेश्वर मित्र मंडळाचे प्रमुख दिगंबर शिंदे, शिक्षक नेते वैभव पठारे , हिंदवी डेरे , शिवांश डेरे उपस्थित होते श्री. वैभव पठारे,श्री. दिगंबर शिंदेगणेश डेरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवाडी,ता.कर्जत येथे १३ वर्ष नोकरी केली.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे उपक्रमशील शिक्षक. हस्ताक्षर सुधार, LFW इंग्रजी सुधार, दिंडी सोहळा,आठवडे बाजार, हस्तकला- राखी तयार करणे, गणपती मातीकाम , विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करणे, तारखेनुसार पाढा पाठ, शिक्षक दिन, एक मूल एक झाड या संकल्पनेतून पर्यावरणाची विद्यार्थ्यांप्रती आवड निर्माण करणारा प्रकल्प, शाळेमध्ये प्रतिभा संपन्न विद्यार्थ्यांना शालाबाह्य स्पर्धा परीक्षांना अतिरिक्त मार्गदर्शन गणेश डेरे यांनी केले. त्यांच्या पुरस्काराचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अभिनंदन केले आहे.