कोरठण खंडोबा तीर्थक्षेत्रावर गगनगिरी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न

अहमदनगर(महेश कांबळे)लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या  कोरठण खंडोबा देवस्थान,पिंपळगाव रोठा या तीर्थक्षेत्रावर  गगनगिरी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला.

सकाळी महाअभिषेक,पूजा,होमहवन,आरती पुरोहित  बाळासाहेब पाटील,शंकर गायकवाड,सुशिलाबाई गायकवाड,अशोक घोडके,कमल घोडके यांच्या हस्ते झाली. 

सकाळी १० वाजता स्वामी गगनगिरी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक कोरठण गडाला प्रदक्षिणा झाली.मिरवणुकीत भाविक,भक्त,शाळेचे विद्यार्थी,खंडेश्वर शिक्षण संस्थेचे विद्यार्थी,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.महाराजांच्या प्रतिमेची महाआरती सभामंडपात झाल्यानंतर आकाश महाराज घोलप,खंडेश्वर वारकरी शिक्षण संस्था यांचे  स्वामी गगनगिरी महाराज यांच्या जीवन चरित्रावर संगितमय प्रवचन झाले.

दुपारी संकल्प विश्वासराव व जय गगनगिरी सेवाभावी मंडळ पिंपळगावरोठाच्यावतीने महाप्रसाद नियोजन करण्यात आले होते.जय मल्हार विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी महाप्रसाद वाटपाचे नियोजन केले होते. 

याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष महेश शिरोळे,सचिव  जालिंदर खोसे,विश्वस्त रामदास मुळे,विश्वस्त धोंडोभाऊ जगताप,शिवाजी ढोमे,बन्सी ढोमे,गोपीनाथ सुंबरे,लक्ष्मण नाना सुंबरे,किसन भिकाजी घुले,पंढरीनाथ वाळुंज,लहू सुंबरे,भाऊसाहेब घुले,बेल्हेकर काठी पालखीचे मानकरी संतोष खोमणे,संकल्प विश्वासराव,धोंडीभाऊ पाबळे,रमेश विश्वासराव,नितीन विश्वासराव,सोमनाथ जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष गोपीनाथ घुले,ग्रामपंचायत सदस्य तानाजी मुळे, सेवा सोयटीचे संचालक भगवान भांबरे,आशोक झिंजाड, देवस्थानचे व्यवस्थापक भाऊसाहेब पुंडे,जय मल्हार विद्यालयाचे विद्यार्थी,विद्यार्थिनी, शिक्षक,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.