बेल्हे(प्रतिनिधी)२४ डिसेंबर रोजी झालेल्या NMMS परीक्षेत आणे येथील सरदार पटेल हायस्कूलचे १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात १६ विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती मिळणार असल्याची माहिती मुख्याध्यापक धोंडीभाऊ शिंदे यांनी दिली.
इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना अर्थात NMMS परीक्षा घेतली जाते.या परीक्षेसाठी विद्यालयातील ३७ विद्यार्थी बसले होते. त्यात १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.१७ पैकी १६ विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती प्रत्येकी ९६०० रुपये पाच वर्षांसाठी मिळणार असल्याचे मुख्याध्यापक धोंडिभाऊ शिंदे यांनी सांगितले.
या परीक्षेत तेजल संपत बेलकर,वैष्णवी विठ्ठल आहेर, सानिका सिद्धेश दाते,सान्वी बाळासाहेब दाते,रोशनी शंकर बेलकर,ओमकार पोपट आहेर,पूर्वा जयराम दाते,सारिका शिवराम बेलकर,साधना रंगनाथ दाते,हर्षवर्धन बबन गांडाळ,धीरज संतोष दाते,आयुष सुदर्शन उबाळे,सर्वेश किशोर आहेर,तेजस्वी लक्ष्मण गायखे,सार्थक नवनाथ राळे,तुषार गेनभाऊ भोसले,सुजल मिनानाथ दाते या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले
NMMS परिक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना तुषार आहेर, अरूण बर्डे,विजय भणगे,शाकीर इनामदार या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन व विकास समिती व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.