कळसच्या योगिता गाडगे’ची डीवायएसपी पदाला गवसणी

कळस । पारनेर तालुक्यातील कळस येथील डॉ.योगिता गाडगे यांनी लोकसेवा आयोगाचा परीक्षेत घवघवीत यश घेऊन पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली आहे.

त्यांचे शालेय शिक्षण व उच्च शिक्षण मुंबई येथे झाले. त्यांनी मुंबईत वैद्यकीय सेवा करत असताना एमपीएससी परीक्षा दिली.

त्यांचे पती डॉ ज्ञानेश्वर पोपट गाडगे व सासू लक्ष्मीबाई पोपट गाडगे एमपीएससी परीक्षेसाठी प्रवृत्त केले. घरातील सर्व कामे स्वत करून लोकसेवा परीक्षाचा अभ्यास त्या करत होत्या.

माझ्या यशामागे आईवडिल,पती ज्ञानेश्वर गाडगे,सासू लक्ष्मीबाई पोपट गाडगे यांच्या पाठबळामुळेच मी यश संपादन करू शकले,अशी प्रतिक्रिया डॉ योगिता गाडगे यांनी बोलताना दिली.

या यशाबाबत त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.