चोंभूत येथे आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य शिबीराला चांगला प्रतिसाद 

चोंभूत(प्रतिनिधी)भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती चोंभुत ग्रामस्थांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिरास प्रतिसाद देत साजरी.

तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध धम्म पद्धतीने पूजा पाठ संपन्न झाला तसेच प्रमुख पाहुणे,माताभगिनी विदयार्थीनी ग्रामस्थ यांची अभिवादन पर मनोगते झाली.

यावेळी डॉक्टर गायकवाड मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले यासाठी डॉक्टर प्रियांका गायकवाड व डॉक्टर डॉक्टर निखिल शिंदे यांनी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करत औषधोपचार केले या शिबिरामध्ये जवळजवळ 111 ग्रामस्थांनी व महिला भगिनींनी सहभाग घेतला.

यावेळी विविध कार्यकारी संस्थेचे चेअरमन दत्तात्रय कोल्हे,विविध कार्यकारी सोसायटी संचालक जनाजी मस्के,ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल पारखे,विविध कार्यकारी सोसायटी संचालक देवराम जमदाडे,किसन गुंजाळ, खंडू शेठ म्हस्के, अशोक मस्के ,तात्याभाऊ माळी,रामदास पारखे, शहाजी जाधव,आळकुटी ग्रामपंचायत सदस्य किरण शिंदे,नीलक्रांती तरुण मित्र मंडळाचे उपाध्यक्ष गणेश रामदास भालेराव खजिनदार संगम भालेराव,सचिव मंगेश भालेराव विजय भालेराव,राजू भालेराव गंगाराम भालेराव,ग्रामपंचायत सदस्य प्रनल पोपट भालेराव,सागर सोनवणे, प्रकाश मस्के, कैलास भालेराव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला आम्ही आरोग्य शिबीर आयोजित केले त्याचा आम्हाला अभिमान आहे खऱ्या अर्थाने महामानवांचे विचार लोकोपयोगी आहेत असे समाजाप्रतिमान ने हाच आमचा एक हेतू आहे- गणेश भालेराव उपाध्यक्ष नीलक्रांती तरुण मित्र मंडळ चोंभुत