पुणे(सुरेशभुजबळ)राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्यच्या प्रदेश समन्वयकपदी बेल्हे गावचे सुपुत्र अनिल गुंजाळ निवड झाली.
अनिल गुंजाळ यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील अनेक दुर्लक्षित कलावंतांना न्याय मिळवून दिला.अनेक जेष्ठ कलावंतांना मानधन मिळवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. अनिल गुंजाळ तथा आण्णा यांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील आजवरच्या अव्याहत कामाची दखल घेवून त्यांची राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्यच्या प्रदेश समन्वयकपदी निवड झाली.
अनिल गुंजाळ यांना त्यांच्या निवडीचे पत्र राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या प्रमुख उपस्थितीतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले.
दरम्यान बेल्हे गावचे सुपुत्र अनिल गुंजाळ यांची राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्यच्या प्रदेश समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन केले आहे.