पारनेर(प्रतिनिधी)कोरठण खंडोबा देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणूक करणे,विश्वस्त निवड प्रक्रिया पुन्हा नव्याने दुसऱ्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त मार्फत करण्याविषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्याची सुनावणी १४ जूनला होणार असल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
अहमदनगरचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त बी.व्ही.दिवाकर यांनी २३/०९/२०२२ चे आदेशाने न्यासाचे पदाधिकारी निवड केली.या विश्वस्तांच्या निवड प्रक्रियेत आयुक्तांनी देवस्थानचे मानकरी मूळ मंदिराचे निर्माणकर्ते परिवारा तील कोणालाही विश्वस्त निवड केले नाही.राजकीय दबावाखाली विश्वस्तांच्या नेमणुका केल्या असल्याचा आरोप याचिका कर्ते संकल्प विश्वासराव,सुमन जगताप, योगेश पुंडे,राहुल पुंडे या भक्तांनी औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाकडे यांनी केला.
औरंगाबाद खंडपीठात ॲड विनोद पाटील यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी १४ जून २०२४ रोजी सुनावणी घेण्याचे निर्देशित केल्याने या सुनावणीकडे पुणे जिल्ह्यातील भाविक भक्तांचे लक्ष लागले आहे.