डॉ.आलिशा तांबोळी यांनी BHMS मध्ये प्रथम श्रेणीत मिळवलं यश
कवठे : कष्ट,जिद्द आणि चिकाटीने कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कवठे गावची सुयोग्य कन्या डॉ. आलिशा शाहिन यूनूस तांबोळी. त्यांनी B.H.M.S. (Bachelor of Homeopathic Medicine and Surgery) अंतिम परीक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळवत डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
या यशामागे त्यांचे वडील, प्रामाणिक आणि समाजकार्यशील वृत्तीचे पत्रकार युनूस तांबोळी यांचे अपार कष्ट, मार्गदर्शन आणि त्याग आहे. पत्रकार म्हणून विविध चढ-उतारांना सामोरं जात असताना त्यांनी आपल्या मुलीचं शिक्षण कधीच थांबू दिलं नाही. आई-वडिलांच्या मेहनतीची आणि प्रोत्साहनाची जाण ठेवत आलिशा यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं.
कवठे गावात आनंदाचे वातावरण असून नागरिकांकडून आणि स्थानिक मंडळींकडून डॉ.आलिशा तांबोळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशामुळे गावाचं नाव अभिमानाने उजळलं आहे.
डॉ. आलिशा यांनी सांगितलं, “माझ्या आई-वडिलांनी मला शिक्षणासाठी जे त्याग केले, त्याची परतफेड शब्दांत करता येणार नाही. हे यश त्यांचंच आहे.”