निमगावसावा : जुन्नर तालुक्यातील निमगावसावा येथे मंगरूळ पारगाव येथे कार्यरत असणारे अनाथ निराधार यांच्यासाठी सेवा करणारी स्वप्नवेध अनाथालय फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने समाजातील कर्तबगार नऊ महिलेचा सन्मान करण्यात आला सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा प्रशासकीय क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या महिलेंना सन्मान नवदुर्गांचा हे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
ह.भ.प बबन महाराज डुकरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकार स्नेहा बारवे, शितल कोटकर, प्रियंका सस्ते, उषा डुकरे, अनिता घोडे, शुभांगी सोनवणे, सुकेशिनी हिंगे, वनिता पाबळे,लताबाई उंडे या महिला नवदुर्गांना सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमाप्रसंगी समीर पठाण, विजय गाडगे, भाजपा महिला सरचिटणीस सुनंदा गाडगे, अजित गाडगे,ॲड.संतोष गाडगे,निलेश गाडगे,सुनील गहिने,नवीन सोनवणे,मंगल गांधी,कविता पवार,मंगल भोजने,प्रियंका बोरामनीषा जाधव, संकेत लोखंडे, बाबू बोराडे, डॉ.सतीश बोरा,सनी उनवणे,डॉ. हिंगे,श्रीरंग गाडगे,बबन घुले,विजय सोनवणे, सुंनदा भापकर,सारीका घोडे,वर्षो जाधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वप्नवेधच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नवेध अनाथालयाचे संस्थापक सचिन भोजने यांनी केले तर आभार ॲड.संतोष गाडगे यांनी मानले