जुन्नर(प्रतिनिधी):श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि.,जुन्नर-आंबेगाव यांच्या सन २०२५-२६ च्या ४०व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवार,(दि.३ नोव्हेंबर २०२५) रोजी सकाळी ९.०० वाजता कारखाना परिसरात संपन्न होणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी आमदार शरद सोनवणे राहणार आहेत.
कार्यक्रमास माजी आ.दिलीप ढमढरे,माजी आ.अतुल बेनके, संजय काळे,माजी आ.बाळासाहेब दांगट,भाजपा नेत्या सौ.आशा बुचके,माऊली खंडागळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष अशोक घोलप,अध्यक्ष सत्यशील शेरकर राहतील.
या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि सभासदांना उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केले आहे.