वकिलांवर अन्याय बंद करा! Advocate Protection Bill तातडीने मंजूर करा — जुन्नर वकील बार असोसिएशनचा सरकारविरुद्ध जाहीर निषेध”

जुन्नर प्रतिनिधी:बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या निर्देशानुसार राज्यभरातील वकील “Advocate Protection Bill” मंजुरीसाठी एकमुखाने पुढे सरसावले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर वकील बार असोसिएशनतर्फे आज न्यायालय परिसरात सरकारविरुद्ध जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.

सरकारने वकिलांच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वकिलांनी “वकिलांवर होणारे हल्ले थांबवा”, “Advocate Protection Bill मंजूर करा” अशा घोषणा दिल्या. काळ्या फिती बांधून, हातात फलक घेऊन वकिलांनी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केले.

न्यायदानाच्या प्रक्रियेत वकील हा महत्त्वाचा घटक असूनही त्यांच्यावर वारंवार होणारे हल्ले चिंताजनक असल्याचे मत संघटनेतील वरिष्ठ वकिलांनी व्यक्त केले. “कायद्याचे रक्षण करणाऱ्यांचेच संरक्षण सरकार देत नाही, ही शोकांतिका आहे,” अशा शब्दांत वकिलांनी संताप व्यक्त केला.

यावेळी वकिलांनी Advocate Protection Bill तातडीने मंजूर करावा, अन्यथा पुढील काळात राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.