सावरगाव,प्रतिनिधी:-सावरगाव(ता.पारनेर)लोककलेच्या परंपरेचा उत्सव आणि लोककलावंतांचा सन्मान एकत्र आणणारा ‘भव्य पुरस्कार सोहळा व शाहिरवाणी’ कार्यक्रम सावरगाव येथे उत्साहात पार पडला.
लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच, महाराष्ट्र राज्य आणि यशस्विनी जनसेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला कलावंत, शाहीर, समाजसेवक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेला उजाळा देणारे अनेक नामवंत शाहीर आणि तमाशा कलावंत या सोहळ्यात सहभागी झाले.त्यामध्ये संजय महाडिक पुणेकर,तमाशा कलावंत,शाहीर गुंड नवनाथ काळे, मारुती भुजबळ, शाहीर साहेबराव पवार,शाहीर तानाजी मालवतकर, स्वप्निल गायकवाड, शाहीर शिवाजी कवडे,शाहीर ठकसेन शिंदे,दत्ता करंदीकर,तमाशा कलावंत रमेश खुडे,स्वाती पुणेकर यांनी आपल्या दमदार सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
लोककलेचा गजर, पोवाड्यांची रणधुमाळी, आणि शाहिरी ओव्या यामुळे सावर्गावात सारा महाराष्ट्र दुमदुमला.
कलावंतांच्या आवाजात ‘मातीचा गंध’ आणि ‘शौर्याचा झंकार’ अनुभवता आला.
या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील कलावंत, शाहीर, समाजसेवक, लोककला जपणारे कार्यकर्ते व साहित्यिक यांचा गौरव केला जाणार आहे.या मंचाच्या वतीने यशस्विनी जनसेवाभावी संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, राज्यभरातील लोककला, पोवाडा, भारुड, लावणी, शाहिरी परंपरेला नवा आयाम देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान याप्रसंगी नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात १०० रुग्णांची तपासणी झाली १७ रुग्णांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे बाळासाहेब शिरतर यांनी सांगितले.
हा सोहळा यशस्वी करण्यात अध्यक्ष बाळासाहेब शिरतर, बाळासाहेब गुजर वसंतराव जगताप,आळे गावचे सरपंच सखाराम भंडलंकर,मोहन साळवे,उत्तम वायदंडे,मनोज आल्हाट,रवींद्र साळवे रामदास साळवे शंकर शिंदे,दिगंबर दाते,मंगेश शिरसाट,संतोष गांजे,संदीप शितोळे,नवनाथ शिरतर,अनिल जेटगुले सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.