वकील बार असोसिएशनचे अध्यक्षपदी ॲड. शिवदास तांबे.

जुन्नर(आनंद कांबळे) । जुन्नर तालुका बार असोसिएशनच्या प्रतिवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. शिवदास तांबे विजय झाले.

अँड.शिवदास तांबे यांना १२२मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी ॲड.केतन पडवळ यांना ७६ मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या तिरंगी लढतीत ॲड. महावीर चोरडिया यांनी १५० मते आणि अजिज खान यांनी१३१मते मिळवत विजयी झाले. तर ॲड. निलिमा शेरकर यांना १०७ मते मिळाली. एकूण २१८ मतदारांपैकी १९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .सचिव पदासाठी ॲड.आशिष वानखेडे यांची यावर्षी बिनविरोध निवड झाली.

मागील वर्षी त्यांनी १२२मते मिळवत विजयी मिळवला होता.त्यांना दुसऱ्यांदा सचिव पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. ग्रंथपालपदासाठी झालेल्या लढतीत ॲड.गणेश आल्हाट १६० मते मिळवत विजयी झाले.सहसचिव महिला राखीव पदावर ॲड.स्वाती दुराफे, खजिनदारपदी ॲड.सुदर्शन पारखे, लेखापरीक्षकपदी ॲड.संजय उकिरडे तसेच कार्यकारणी सदस्यपदी ॲड.भुषण शेटे,ॲड.नूतन शेगर ,ॲड.शिवम नायकोडी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड.शरद गुरव , ॲड. कृष्णकांत ढमढेरे ॲड.कुसुम उतळे,तसेच मदतनीस म्हणून ॲड. गौरव रोकडे, रेवणनाथ कांडेकर यांनी काम पाहिले.