बेल्हे(प्रतिनिधी)राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाने,ताडीवर बंदी घालण्यासाठी दरवर्षी देण्यात येणारे विक्री परवाना देणे बंद केले असले,तरी औरंगपूर, भोरवाडी येथे,भेसळयुक्त ताडीचा महापूर वाहत असल्याची चर्चा आहे.
शिंदाडाची झाडे नसल्याने,शरीराला पोषक ठरणारी आयुर्वेदिक ताडी मिळत नाही,त्या ऐवजी संबधित ताडी विक्रेते निघोज(ता.पारनेर)परिसरात स्वमालकीची शिदाडाची झाडे असल्याचे कागदोपत्री रंगवून,दरवर्षी ताडी विक्रीचे परवाने उत्पादनशुल्क विभागाकडून मिळवत होते.शिदाडाच्या झाडाची आयुर्वेदिक ताडी ग्राहकांना विक्री करण्यापेक्षा रासायनिक नशेची पावडर मिश्रण करून भेसळयुक्त ताडी विक्रीची राजरोजपणे करीत आहेत.
या भेसळयुक्त ताडीच्या सेवनामुळे औरंगपूर,भोरवाडी परिसरातील अनेक तरुणांना मेंदूचे आजार,पोटदुःखी, स्मरणशक्ती नष्ट होणे अशा विविध प्रकारच्या आजाराची लागण झाली असल्याचे वैद्यकीय तपासणीचा अहवालातून स्पष्ट होऊ लागल्यानंतर ग्रामस्थांनी ताडी विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी सुरु केली.मात्र उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने,संबधित ताडी विक्रेतेचा परवाना असल्याने,त्याकडे कानाडोळा केला,असल्याचे बोलले जाते.
राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाच्या शिदाडाची झाडे नसल्याने,ताडी विक्रेते सर्रास रासायनिक पावडर मिश्रण करून भेसळयुक्त ताडी विक्री करत आहेत.या भेसळयुक्त ताडी सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे निदर्शनास येताच, ताडी विक्रीवर बंदी घालण्यासाठी शासनाकडून दरवर्षी देण्यात येणारे ताडीविक्रीचे परवाने देणे,बंद केले.त्यामुळे ग्रामीण भागात बऱ्यापैकी ताडीविक्री बंद झाली.मात्र औरंगपूर, भोरवाडी येथून जुन्नर,पारनेर,संगमनेर,अकोले,मुरबाड तालुक्यात होणाऱ्या ताडीविक्रीच्या विक्रेत्या ना भेसळयुक्त ताडीचा पुरवठा होत आहे.
या ताडी विक्री केंद्रावर छापा टाकायला जाणारे उत्पादन शुल्क विभाग व पोलीस छाप्याची कारवाई न करताच रिकाम्या हाताने,कसे परततात,याविषयी परिसरात उलट-सुलट चर्चा सुरु आहे.