नारायणगाव-नळावणे एसटी सुरू करण्याची मागणी

बेल्हे(प्रतिनिधी): नारायणगाव एस.टी. आगाराने बंद केलेली नारायणगाव-नळावणे ही बस सेवा पूर्वरत करण्याची मागणी सरपंच सौ.अर्चना उबाळे यांनी नारायणगाव आगार व्यावस्थापणाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नारायणगाव एस टी आगार व्यावस्थापणाला दिलेल्या निवेदनात सरपंच उबाळे यांनी म्हटले आहे की,नारायणगाव एसटी आगराची सुरू असलेली नारायणगाव- नळावणे ही बस आगार व्यावस्थापणाने बंद केली ही बस बंद केल्याने, नळावणे,आणे,आळेफाटा,आळे,राजुरी,बेल्हे, साकोरी परिसरातील प्रवाशी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

आळे येथील महाविद्यालयात परिसरातील एक हजाराहून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळेस जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची एसटी बससेवा उपलब्ध नाही.विद्यार्थी सकाळी खाजगी वाहनाने महाविद्यालयात जातात पण महाविद्यालय सुटल्यानंतर नारायणगाव आगाराची नारायणगाव-पोखरी फक्त एसटी बस त्यांना घरी परतताना उपयोगी पडते.लांब पल्ल्याच्या बस महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवास नाकरतात,त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना नारायणगाव एसटी आगराच्या बसेसवर अवलंबून राहावे लागते.

आळे बसस्थानकात तास-दोन तास ताटकळत रहावे लागते.यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.नारायणगाव एसटी आगार व्यावस्थापनाने नारायणगाव-नळावणे ही एसटी बस सेवा पूर्ववत मार्गाने सुरू करण्यात यावी,अशी मागणी सरपंच अर्चना उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

दरम्यान अधिक माहिती करीता आमच्या प्रतिनिधी ने नारायणगाव एसटी आगराच्या प्रमुखाशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांची भूमिका समजू शकली नाही.