आळे(बाबाजी टाकळकर):
जि,प,प्रा शाळा आळे या शाळेच्या वतीने एकादशी निमित्त
गुरुवार दि,१३/७/२०२३रोजी दिंडीचे आयोजन करण्यात आले दिमाखदार ,ग्रामीण वेशभूषेत सर्व शालेय विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले,ज्ञानोबा माऊली तुकाराम व विठ्ठल नामाच्या गजरात टाळ, मृदुंगाच्या निनादात दिंडीचे प्रस्थांन ज्ञानेश्वर महाराज यांच्या रेडा समाधी स्थळी झाले ,प्रसंगी मंदिराचा परिसर मोठ्या भक्तिमय वातावरणात डुंबून गेला होता, स्थानिक महिला.

सर्व शिक्षक,शिक्षिका, प्रदक्षिणा फेरी मारत असताना ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषात रंगून गेले होते
ग्रामस्थमहिला व शिक्षिका तसेच चिमुकले वारकरी
यांनी फुगड्यांचा आनंद मनमुराद घेताना पाहावयास मिळाला, या सुंदर सोहळ्याचे नियोजन मुख्याध्यापिका सौ.नंदा आवटे
जाधव मॅडम,अभंग मॅडम, गंभीरे मॅडम,घाडगे,खर्डे,ढमाले मॅडम,देवगिरे , सौ माताडे मॅडम ,कचरे मॅडम शिक्षकांच्या नियोजनाने दिंडी सोहळा अवर्णनीय पार पडला या प्रसंगी समस्थ ग्रामस्थ आळे व पालकवृंदाचे सहकार्य लाभले,
या प्रसंगी देवस्थानचे विश्वस्त संजूशेठ कुऱ्हाडे यानी खाऊ वाटप करून शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले .