पारनेर तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी जाहीर

पारनेर(प्रतिनिधी):श्रीकांत चौरे

३६ वर्षांची परंपरा असलेल्या पारनेर तालुका पत्रकार संघाचे हे ३६ वर्ष असून आज बाजार समितीच्या सभागृहात बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत संघाची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली .
या नवीन कार्यकारणीत पारनेर तालुका पत्रकार संघ तालुकाध्यक्ष पदी उदय शेरकर,कार्याध्यक्षपदी दत्त उनवणे , उपाध्यक्षपदी भास्करराव कवाद, आणि दादा भालेकर, सचिव पदी विजय वाघमारे, सह सचिव भास्कर पोपळघट, सामाजिक उपक्रम प्रमूख विनोद गोळे, खजिनदार शशिकांत भालेकर, सदस्यपदी सुरेंद्र शिंदे, श्रीकांत ठूबे, अमोल खिलारी, शरद रसाळ, मंगेश पारखे, सतीष ठूबे, संतोष सोबले, श्रीकांत चौरे इ. बिनविरोध निवड करण्यात आली

उदय शेरकर (अध्यक्ष) विजय वाघमारे (सचिव)


बैठक सुरु झाल्यांनतर मावळते अध्यक्ष शरद झावरे यांनी नवीन कार्यकारणी निवडीचा प्रस्ताव ठेवला यास मार्तंड बुचुडे सर यांनी अनुमोदन दिले यानंतर तालुका संघाचे मार्गदर्शक व अहमदनगर पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी शिर्के,तालुका संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे,मार्तंड बुचुडे ,देविदास आबूज व दत्ता उनवणे या कोअर कमिटीने नवीन कार्यकारणी बनवून सभागृहात जाहीर केली
यावेळी पत्रकार संघाचे सनी सोनावळे, किरण शिंदे, योगेश खाडे, बाबाजी वाघमारे, जयदीप कारखिले, सतीष रासकर व तालुक्यातील पत्रकार व मान्यवर मंडळी उपस्थितीत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे ,बाजार समितीचे सचिव सुरेश आढाव ,उदयोजक राजेंद्र तारडे ,किसन गंधाडे,राजेंद्र चेडे ,नामशेठ पवार ,दीपक पवार आदींनी नवीन कार्यकारणीचे सन्मान केला .