वडगाव आनंद’ला जोडलेले आळेफाटा तलाठी कार्यालय चाळकवाडीला गेल्याने ग्रामस्थांचा विरोध

बेल्हे,दि.(प्रतिनिधी)वडगाव आनंद(ता.जुन्नर)येथील तलाठी कार्यालयाला वडगाव आनंद,पादिरवाडी व मौजे आळेफाटा हि गावे समाविष्ट असून महसूल विभागाने नागरिकांना अंधारात ठेवत सन २०१७ यावर्षी आळेफाटा या महसुली गावाचे तलाठी कार्यालय गावातील ग्रामस्थांना माहिती न होता चाळकवाडी महसुली गावाला जोडले गेल्याने वडगाव आनंद येथील ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला.

  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार  वडगाव आनंद ग्रामपंचायत हद्दीतुन  गेली अनेक वर्षे वडगाव आनंद,  आळेफाटा व पादीरवाडी या तीनही गावांचा महसुली कारभार चालू असून मौजे आळेफाटा वडगाव आनंद तलाठी कार्यालयापासून तोडण्यासाठी जी जाहीर अधिसूचना व जाहीर दिवंडी या कार्यालयाने जाहीर करणे अपेक्षित होते तसे त्यांनी केले नाही .

    वडगाव आनंद, आळेफाटा पादीरवाडी अशी तीन गावे झाली असली तरी तीनही गावात शेतजमीन असणारे अनेक शेतकरी आहेत व याचा सर्वात जास्त फटका हा या शेतकरी बांधवाना होणार आहे, त्यामुळे या प्रकाराला विरोध करण्यासाठी ग्रामपंचायत वडगाव आनंद येथील ग्रामपंचायतीने  विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते डी.बी.वाळूंज, ॲड. भानुदास गडगे, अनंतराव चौगुले, नवनाथ वाळूंज, सचिन वाळूंज, कैलास वाळूंज, भगीरथ गडगे, जालिंदर पादीर, गणेश वाघमारे, चंद्रकांत देवकर, सुरेश देवकर, प्रशांत देवकर, सुरेश शिंदे, नारायण वाळूंज आदी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

या वेळी ग्रामसभेत माहिती देताना डी.बी.वाळुंज यांनी सांगितले की तलाठी कार्यालय वडगाव आनंद या कार्यालयात समाविष्ट असणारी  पादीरवाडी व आळेफाटा या गावांची सन २०११ च्या जनगणनेनुसार असणारी लोकसंख्या प्रामुख्याने तसेच अनुक्रमे २४८४, ९९१ व ३२४८ म्हणजे एकूण ६७२३ लोकसंख्या तसेच महसुली क्षेत्रफळ १६०७.९८ हेक्टर असल्याची माहिती देत मौजे चाळकवाडी व मौजे भटकळवाडी या दोन गावांची सन २०११ च्या जनगणनेनुसार असणारी लोकसंख्या प्रामुख्याने तसेच अनुक्रमे ३६२७ व २५४९ महणजे एकूण ७१६७ असून तसेच महसुली क्षेत्रफळ १५६७.६७ हेक्टर असल्याची माहिती दिली. तसेच आळेफाटा हे महसुली गाव  चाळकवाडी या गावाला जोडल्यास तलाठी कार्यालय वडगाव आनंद या कार्यालयाची लोकसंख्या ३४७५ तर महसुली क्षेत्रफळ १२५१.०८ अशी होणार आहे याउलट तलाठी कार्यालय मौजे चाळकवाडी या गावची होणारी लोकसंख्य ९४२४ तर महसुली क्षेत्रफळ १९२१.५७ हेक्टर होणार आहे. या चुकीच्या बदलाने विनाकारण नागरिक तसेच शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात गैरसोय करत शासनदरबारी चुकीची माहिती सादर केल्यामुळे  गरज नसताना देखील आळेफाटा तलाठी कार्यालय चाळकवाडी या गावाला जोडला जात आहे. याबद्दल या बाबीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन जाहीर निषेध केला आहे. कोणत्याही किमतीला  आळेफाटा या महसुली गावाचे तलाठी कार्यालय मौजे वडगाव आनंद या ठिकाणी असणाऱ्या तलाठी कार्यालयातच राहणार व ठेवणार या भूमिकेवर शेतकरी बांधव ठाम आहेत.

या सभेतून उच्च न्यायालयात अपील दाखल करणे हा पर्याय निवडला गेला असून ग्रामपंचायत कार्यकारिणीला सर्व अधिकार व खर्च करण्याचे अधिकार ग्रामस्थांनी दिले आहेत. या सभेला सरपंच रेलिका जाधव, उपसरपंच ऋषी गडगे, सदस्य गणेश भुजबळ, प्रफुल इथापे, संदीप गडगे, संतोष पादिर, गोरक्ष देवकर, सोमनाथ गडगे तसेच सदस्य वैशाली देवकर, अल्पना देवकर, कल्पना पादिर, अश्विनी चौगुले, अर्चना काशिकेदार, वंदना शिंदे, शोभा शिंदे,  ग्रामविकास अधिकारी प्रदीप खिल्लारी आदी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.