बेल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरला आनंदी बाजार

बेल्हे,दि.(प्रतिनिधी)बेल्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ या शाळेत रविवारी आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यात बेल्हे हे गाव बाजारासाठी प्रसिद्ध आहे.या गावातील विद्यार्थ्यांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना बाजारातील व्यवहाराचे ज्ञान यावे,या अनुषंगाने आज जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंदी आठवड्या बाजाराचे आयोजन करण्यात आले.

या बाजारात विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचा भाजीपाला विक्रीसाठी आणला होता.त्यासोबत विविध प्रकारची फळे ,खाऊ गल्ली, कडधान्य,किरकोळ विक्रीच्या वस्तू बाजारामध्ये आणल्या होत्या.

पालकांनी बाजाराला उत्कृष्ट प्रतिसाद देत आनंदी बाजारामध्ये सहभाग घेत बाजारात खरेदी केली. सर्वांच्या सहकार्यामुळे बाजारामध्ये वीस हजार रुपयांची उलाढाल झाली.

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुप्रिया बांगर ,उपाध्यक्ष सोहेल बेपारी सदस्य दादाभाऊ मुलमुले,शेखर पिंगट,गायत्री भालेराव,वैशाली मटाले,शितल गुंजाळ, मनीषा बांगर सदस्य यावेळेस उपस्थित होते.

सर्व मान्यवरांनी चिमुरड्या मुला- मुलींचे कौतुक केले . इतर वेळी आपल्या आईवडिलांबरोबर बाजार आणण्यासाठी जाणारे बालचमु आज स्वतः वस्तूंची  देवाण-घेवाण करताना पैशाचा हिशोब करत होते.

वर्गात मिळविलेले ज्ञान प्रत्यक्ष जीवनात अंगीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्याजोगे होते. हे पाहताना शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह पालकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

शाळेचे मुख्याध्यापक मीरा बेलकर ,उपशिक्षिका सुवर्णा गाढवे,कविता सहाणे,प्रवीना नायकोडी,योगिता जाधव, सूषमा गाडेकर संतोष डुकरे,हरिदास घोडे,अंजना चौरे यांनी या आनंदी बाजाराचे नियोजन केलं होते.