नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

बेल्हे, दि.(प्रतिनिधी)राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सन २०२३-२४ अंतर्गत जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य प्रशिक्षण वर्ग ८ ते १३ जानेवारी दरम्यान घेण्यात येणार आहेत.

जुन्नर तालुक्यात सन २०२३ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायत कामकाज प्रशिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सन २०२३-२४ अंतर्गत जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य प्रशिक्षण वर्गाबाबत मागणी केली होती.पवार यांनी या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर त्यास मान्यता देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना राज्य सरकारच्या ग्रामपंचायत विभागाने पत्राद्वारे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सन २०२३-२४ अंतर्गत पंचायत राज प्रशिक्षण केंद्र वर्य, सातारा या कार्यालयास जुन्नर पंचायत समितीकडून २७८ सरपंच सदस्यांची यादी प्राप्त झाली आहे.यांचे प्रशिक्षण दिनांक ०८ जानेवारी ते १३ जानेवारी २०२४ अखेर आयोजीत करण्यात आले आहे.

दि.०८ ते १० जानेवारी २०२४ दरम्यान ७४+७७ असे १५१ सदस्यांसाठी अदिवासी विकास प्रबोधनी जुन्नर येथे,दि.११ ते १३ जानेवारी २०२४ दरम्यान ग्रामपंचायत सभागृह राजुरी येथे ६४+६३असे १२७ सदस्यांसाठी प्रशिक्षण होणार आहे.